Kolhapur Vishesh
Crime News Cyber Political News Regional News आध्यत्म क्रीडा देश/विदेश नोकरी विषयक पोलीस तपास कथा मनोरंजन महाराष्ट्र

rane criticizes aghadi govt: ‘कोकणातले राजकारण तापले; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप

हायलाइट्स:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका.आघाडी सरकार हे सूडाचे राजकारण करत आहे- नारायण राणे.कणकवलीतील मारहाण प्रकरणात नितेश राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न आहे- नारायण राणे.सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नगरपंचायती आणि जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता येत असल्याचे पाहून आता सूड भावनेने आघाडी सरकार कारवाई करत आहे, असा गंभीर आरोपच केंद्रीय मंत्री राणे यांनी केला आहे. कणकवलीत झालेल्या मारहाणीच्या घटनेसंदर्भात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि गोट्या सावंत यांचा संबंध लावण्याचे काम सुरू असून पोलिस आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत. ते नितेश राणे आणि माजी जिल्हाध्यक्ष संदेश सावंत यांना चौकशीसाठी बोलावून त्यांच्या अटकेचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे. (Union Minister Narayan Rane has alleged that an attempt is being made to arrest MLA Nitesh Rane)क्लिक करा आणि वाचा- सर्वत्र कौतुक! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्यनारायण राणे हे कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील आघाडी सरकार हे बळाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत आहे. त्या माध्यमातून हे सरकार आमदार नितेश राणे यांना मारहाणीच्या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, हे पोलिसांनी लक्षात ठेवावे. पोलिस जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर प्रसंगी भव्य मोर्चा काढू. त्यामुळे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करू नये, अशा शब्दात केंद्रीय मंत्री राणे यांनी पोलिसांनाही सूचक सूचक इशारा दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘राणेंच्या नादाला लागलात, तर मग हर्बल तंबाखू पण कामाला येणार नाही’; मालिकांवर प्रहारराणेंची अजित पवारांवरही टीकामी १०० कोटी देऊन जा असे म्हणालो होतो. लघुपाटबंधारेचे टेंडर अद्याप झालेले नाही. तेरा कोटी मागितले असताना त्यांपैकी ६कोटी रुपये आले. मात्र, त्यातील एकही रुपया खर्च झालेला नाही, असे राणे म्हणाले. हे बजेटची भाषा करतात. परंतु त्यांना बजेट, अर्थात अर्थसंकल्प नेमका समजतो का?, असा टोलाही नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा- आमदार नितेश राणे कणकवली पोलिस ठाण्यात; झाली अर्धा तास चौकशी, म्हणाले…

अक्कल लागते असे अजित पवार त्यांच्या कार्यकर्त्यांनाच म्हणाले. त्यांनीच भ्रष्टाचार केला आहे. संचयनीतही भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे कारभार करण्यासाठी अक्कल लागते. जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी अकलेचे काय तारे तोडलेत हे जनतेला आता कळून चुकलेलेच आहे, असा घाणाघातही राणे यांनी केला आहे.

Related posts

कामगाराला बाहेर काढताना मालकही सेप्टिक टँकमध्ये पडले आणि…

cradmin

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून १०८ वर्षीय आजोबांचा फोटो ट्विट, म्हणाले, ‘लस घ्यायला लागतीय’

cradmin

राज्यात तुरीच्या उत्पादनात मोठी घट, ऐन हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका

cradmin

Leave a Comment