Kolhapur Vishesh
Crime News Political News Regional News आध्यत्म क्रीडा देश/विदेश नोकरी विषयक पोलीस तपास कथा मनोरंजन महाराष्ट्र

राष्ट्रवादीची भाजपशी जवळीक; काँग्रेसचा भडका, वरिष्ठांकडे केली ‘ही’ मागणी

हायलाइट्स:अहमदनगर काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीविरोधात असंतोषआगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची कार्यकर्त्यांची भावनाराष्ट्रवादी काँग्रेस भाजपशी सलगी करत असल्याचा आरोपविजयसिंह होलम । अहमदनगरमहापालिकेच्या राजकारणात स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने भाजपशी सलगी करण्यात येत असल्याचा आरोप करून काँग्रसने आता स्वबळाची भाषा केली आहे. आगामी विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्धार स्थानिक कार्यकर्त्यांनी केला असून वरिष्ठांकडे तशी मागणी करण्यात येणार आहे.

श्रीपाद छिंदम याला अपात्र ठरविण्यात आल्याने त्याच्या जागेवर महापालिकेची पोटनिवडणूक झाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. भाजपने ही जागा पुन्हा जिंकली. या निवडणुकीत काँग्रेसने अलिप्त भूमिका घेतली होती. आघाडीतर्फे शिवसेनेचा उमेदवार रिंगणात होता. शिवसेनेच्या शहर प्रमुखांनी विश्वासात घेतले नाही, अशी तक्रार करून काँग्रेस अलिप्त राहिली. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू होती. अशातच पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सत्कार केला. यावरही काँग्रेसने टीका केली.

वाचा: शाळा, महाविद्यालयांत करोना संसर्ग वाढला! नगरनंतर आता पुण्यातून चिंताजनक बातमी

या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अत्यंत संतप्त भावना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासमोर व्यक्त केल्या. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करून विजयी झालेल्या भाजप उमेदवाराचा सत्कार केला असा आरोप करण्यात आला. ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, इंटकचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनिफ शेख, काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, उपाध्यक्ष अरुण धामणे यांच्यासह पक्षाच्या महिला, युवक, कामगार, विद्यार्थी, वकील, शिक्षक आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

वाचा: कामगाराला बाहेर काढताना मालकही सेप्टिक टँकमध्ये पडले; दोघांचा मृत्यू

जिल्हाध्यक्ष काळे म्हणाले, कार्यकर्त्यांच्या भावनांची आपण दखल घेतली आहे. शहरातील काही नेतेमंडळी एका पक्षात राहून शहरातील सर्वच पक्ष आम्ही चालवतो अशा आविर्भावात आहेत. पोटनिवडणुकीत महाआघाडीचा शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला याची खंत काँग्रेस पक्षाला आहे. शिवसेनेच्या नेत्यांशी या संदर्भामध्ये आपण निवडणुकीनंतर संवाद साधला आहे. सेना, काँग्रेसचे संबंध उत्तम आहेत. काँग्रेस ही कुणाच्या दावणीला बांधलेली नाही. शहर काँग्रेसमध्ये फक्त राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचाच आदेश चालतो. कार्यकर्त्यांच्या भावना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना निश्चितपणे कळविल्या जातील. आपल्याला महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. भाजपला सत्तेपासून रोखायचं आहे. मागील अडीच वर्षे भाजपने शहरात राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता उपभोगली. मात्र या अभद्र युतीने शहर भकास करून ठेवले. रस्त्यांची दुरावस्था आपण शहरात पाहत आहोत. कुणाला कुणाबरोबर जायचे ते जाऊ द्या. मात्र स्वबळावर काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असेही काळे म्हणाले.

वाचा: पुण्यात बंटर शाळेच्या समोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले, पायाचा चेंदामेंदा

Related posts

गडचिरोली जिल्ह्यातील ‘हे’ निसर्गरम्य हिल स्टेशन माहितीये का?

cradmin

ST Strike News Today : एसटी कर्मचाऱ्यांनी गमावली संधी, दीड हजार एसटी कर्मचारी अद्याप संपावर

cradmin

LIVE: Ex-NSE boss Chitra Ramkrishna sent to 7-day CBI custody

kolhapurvishesh

Leave a Comment