Kolhapur Vishesh
Crime News Political News Regional News आध्यत्म क्रीडा देश/विदेश नोकरी विषयक पोलीस तपास कथा मनोरंजन महाराष्ट्र

गडचिरोली जिल्ह्यातील ‘हे’ निसर्गरम्य हिल स्टेशन माहितीये का?

हायलाइट्स:३१ डिसेंबरसाठी पर्यटक सज्जनिसर्गरम्य स्थळाची पर्यटकांना भुरळगडचिरोली जिल्ह्यातील हिल स्टेशन गडचिरोलीः डिसेंबर हा वर्षातील शेवटचा महिना सोबतच ख्रिसमस आणि शनिवार, रविवार मिळून आल्याने या आठवड्यात बरेचजण घरातून ३१ डिसेंबर साजरा करण्याचा प्लॅन आखत आहेत. पर्यटकांसाठी हा आठवडा लाखमोलाचा ठरत आहे आणि बरेच ठिकाणी पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा ही गर्दी बघायला मिळत असले तरी अजूनही गडचिरोलीतील बरेच पर्यटनस्थळ जगासमोर येऊ शकले नाही. विदर्भातील नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलदरा प्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा मुतनूर येथे “हिल स्टेशन” आहे.

हिल स्टेशनच बरोबरच हे एक धार्मिक स्थळ आहे. डोंगर-दऱ्या व निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या देवस्थानाला ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. परंतु या धार्मिक स्थळांचा विकास झाला नाही. या ठिकाणी गणेश, हनुमान,दुर्गा, शंकर-पार्वती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. हे स्थळ चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ठ आहे.

वाचाः नितेश राणे अज्ञातवासात आहेत का?; नारायण राणेंनी दिलं उत्तर…निसर्गरम्य वातावरणामुळे हे धार्मिक स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. वर्षभर भाविकांची गर्दी असते. गुढीपाडव्याला येथे मोठी यात्रा भरत असल्याने दूरवरुन भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या “हिल स्टेशन” वर जाण्यासाठी ७०० मीटर अंतर पार करावे लागते. ७०० मीटर अंतर कापत असताना विविध मंदिरे आढळतात. पर्यटक आणि भाविक दर्शन घेत हिल स्टेशन वर जातात. डोंगराच्या शेवटच्या टोकावर शंकर- पार्वतीचे मंदिर असून या ठिकाणी दर्शन घेऊन हिल स्टेशनवर आपला आनंद द्विगुणित करतात.

वाचाः सोशल मीडियावर भरली हिवाळी अधिवेशनाची शाळा; सर्वात हुशार विद्यार्थी देवेंद्र फडणवीसमात्र, हिल स्टेशनवर वाहने जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासन आणि प्रशासनाने लक्ष देऊन पर्यटन स्थळाचा विकास केल्यास मोठा महसूल मिळू शकतो, अशी भावना व्यक्त होत आहे.

वाचाः अरे देवा! ऊसाच्या फडातून मोदींची ‘मन की बात’ अधुरीच, Live सुरु झालं आणि…

Related posts

राष्ट्रवादीची भाजपशी जवळीक; काँग्रेसचा भडका, वरिष्ठांकडे केली ‘ही’ मागणी

cradmin

ST Strike News Today : एसटी कर्मचाऱ्यांनी गमावली संधी, दीड हजार एसटी कर्मचारी अद्याप संपावर

cradmin

दुबईहून आलेल्या तरुणाची ना दिल्ली ना औरंगाबादेत चाचणी, आता धक्कादायक रिपोर्ट समोर

cradmin

Leave a Comment